'बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उद्धार' या सहकाराच्या उक्तीप्रमाणे, उदात्त हेतूने प्रेरित झालेल्या जालना येथील काही स्वयंसेवकांनी ३४ वर्षांपूर्वी एकत्र येवून दि. २ जून १९९० रोजी देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जालना ची स्थापना करून शहरामध्ये आर्थिक क्षेत्रात या विचारांची मुहूर्तमेढ रोवली.
ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून स्थापन केलेली ही पतसंस्था आज प्रगतीपथावर असून यशाचे आलेख उंचावणारी, आपली सर्वांची जिव्हाळ्याची संस्था तसेच जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. १८ शाखा व ०१ विस्तार कक्ष अशा विस्तारासह संस्था समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आर्थिक पाठबळ देवून सक्षमपणे स्वावलंबी बनण्यासाठी साहाय्यभूत होणारी पतसंस्था ठरली आहे.
स्थापनेपासून आजपर्यंत देवगिरी पतसंस्थेने केवळ आर्थिक नफा मिळवणे एवढ्यापुरती पतसंस्थेची चौकट मर्यादित ठेवली नाही तर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देण्यात पतसंस्था नेहमीच अग्रेसर असते. सहकार तत्वाचे पालन करत असतानाच सर्व सभासदांच्या गरजांची पूर्तता होऊ शकेल अशा प्रकारे विविध कर्ज योजना पतसंस्थेतर्फे नियमित राबविल्या जातात.
आर्थिक क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रम म्हणून मोसंबी परिषद, भूकंपग्रस्तांना मदत, गरिबांसाठी स्वर्गरथ, दुष्काळात जनावरांसाठी चारा छावणी, स्मशानभूमीसाठी मदत इ. उपक्रम संस्थेने आजपर्यंत राबवले आहेत. त्या बरोबरच जल्पुनर्भरण करण्यासाठी बिनव्याजी कर्ज, ज्येष्ठ नागरिक सभासदांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवर्धिनी योजना, त्यामध्ये सभासदांच्या प्राथमिक चाचण्या करण्यात येतात, असे उपक्रम संस्था नित्य राबवीत आहेच.
'सब समाज को लिये साथ मे, आगे है बढते जाना' या उक्तीप्रमाणे काम करणाऱ्या देवगिरी पतसंस्थेला २०१२ साली महाराष्ट्र शासनाने 'आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त' 'सहकारनिष्ठ' पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.
|